---Advertisement---

‘सर्वांसाठी घरे’ योजनेसाठी वाळूची अडचण संपली – बीड प्रशासनाचा निर्णय

On: December 27, 2025 1:26 PM
Follow Us:
---Advertisement---

बीड जिल्ह्यातील घरकुल लाभार्थ्यांसाठी मोठा दिलासा ५ ब्रास मोफत वाळू देण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे व्यापक नियोजन

बीड जिल्ह्यातील घरकुल लाभार्थ्यांसाठी दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील प्रधानमंत्री आवास योजना व इतर घरकुल योजनांतर्गत लाभ घेणाऱ्या नागरिकांना मोफत ५ ब्रास वाळू उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून व्यापक आणि नियोजनबद्ध प्रयत्न सुरू आहेत.

मा. जिल्हाधिकारी श्री. विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल प्रशासन आणि जिल्हा परिषद समन्वयाने ही योजना प्रभावीपणे राबवली जात आहे.जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाच्या बैठकाघरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू उपलब्ध करून देण्याबाबत दि. ८ डिसेंबर २०२५ आणि दि. १६ डिसेंबर २०२५ रोजी मा. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाच्या बैठका घेण्यात आल्या. या बैठकींना जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच गट विकास अधिकारी उपस्थित होते. यासोबतच दरमहा होणाऱ्या महसूल आढावा बैठकीतही या विषयाचा नियमित आढावा घेण्यात येत आहे.

या बैठकीदरम्यान शासन निर्णय दि. ०८ एप्रिल २०२५ व दि. ३० एप्रिल २०२५ मध्ये दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू देण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले.१३ मोठे व ८० लहान वाळूघाट निश्चितघरकुल लाभार्थ्यांना वाळू पुरवठा सुलभ व्हावा यासाठी बीड जिल्ह्यातील १३ प्रमुख वाळूघाट निश्चित करण्यात आले आहेत. याशिवाय संबंधित तालुक्यांमधील लहान नद्या, नाले व ओढ्यांमधून वाळू उपलब्ध करून देण्यासाठी ८० लहान वाळूघाट निश्चित करण्यात आले आहेत.या वाळूघाटांच्या माध्यमातून आतापर्यंत १२७१ घरकुल लाभार्थ्यांना एकूण २४६४ ब्रास वाळू मोफत वितरित करण्यात आली आहे.

हा उपक्रम ग्रामीण भागातील गरजू कुटुंबांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे.३६ वाळूघाटांमधून १० टक्के वाळू घरकुलांसाठी राखीवशासन निर्णयानुसार पर्यावरण मान्यता प्राप्त वाळूघाटांमधून १० टक्के वाळू घरकुल लाभार्थ्यांसाठी राखीव ठेवण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार बीड जिल्ह्यातील ३६ वाळूघाटांमधून एकूण ३७,१२९ ब्रास वाळू घरकुल लाभार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे.सध्या ई-निविदा प्रक्रियेतून लिलावात गेलेल्या १० वाळूघाटांमधून ९,०९९ ब्रास वाळू घरकुल लाभार्थ्यांना उपलब्ध करून दिली जाणार आहे.

महा-खनिज प्रणालीद्वारे ETP पास – जलद प्रक्रियाघरकुल लाभार्थ्यांना वाळू तात्काळ मिळावी यासाठी महा-खनिज प्रणालीवरून ETP पास चलन देण्याची कार्यपद्धती अमलात आणण्यात आली आहे. यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून, SOP (Standard Operating Procedure) देखील देण्यात आली आहे. त्यामुळे वाळू वितरणात पारदर्शकता आणि गती येणार आहे.जप्त वाळूही घरकुल लाभार्थ्यांसाठीबीड व शिरूर तालुक्यात जप्त करण्यात आलेली १५० ब्रास वाळू घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाटप करण्यास उपविभागीय अधिकारी बीड यांनी परवानगी दिली आहे. यापुढेही जप्त होणारी वाळू घरकुल लाभार्थ्यांसाठी वापरण्याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाने दिले आहेत.

‘सर्वांसाठी घरे’ योजनेसाठी महसूल प्रशासनाचा मोठा हातभारजिल्हा परिषद बीडमार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘सर्वांसाठी घरे’ या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी महसूल प्रशासनाकडून वाळू उपलब्ध करून देण्याचे हे प्रयत्न उल्लेखनीय आहेत.

यामुळे गरजू कुटुंबांचे घराचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होण्यास मोठी मदत होत आहे.जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहनया सर्व पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील पात्र घरकुल लाभार्थ्यांनी मोफत ५ ब्रास वाळूचा लाभ घ्यावा, असे आवाहन मा. जिल्हाधिकारी श्री. विवेक जॉन्सन यांनी केले आहे.

ही योजना प्रभावीपणे राबवली गेल्यास जिल्ह्यातील हजारो कुटुंबांना दिलासा मिळणार असून, घरकुल बांधकामाला मोठी गती मिळेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

महत्वाच्या बातम्या

चार वर्षांपासून रखडलेलं दर्शन बारी मंडपाचं काम; यंदाही महाशिवरात्रीला वैजनाथ मंदिराच्या उत्तर पायऱ्यांवरच भाविकांच्या रांगा

कपिलधार देवस्थानात १६ वर्षीय मुलीचा बालविवाह उधळलाAHTU च्या धडक कारवाईत मुलगी ताब्यात; ८ आरोपींसह ५०-६० वऱ्हाडींवर गुन्हा दाखल

दहावी-बारावीच्या परीक्षा केंद्रांवर ‘एआय’ कॅमेऱ्यांची कडक नजर; गैरप्रकार करणाऱ्यांवर थेट कारवाईचे आदेश

‘हीच खरी समाजसेवा’ – अपघातग्रस्ताला जीवदान देणाऱ्या ढाकणे दाम्पत्याचा गौरव

वसुंधरा विद्यालयाचा ‘पॅटर्न’ शिष्यवृत्ती परीक्षेत गाजला; ९ वर्षांत ९९३ विद्यार्थ्यांची यशस्वी कामगिरी

अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा; सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला NABL ची राष्ट्रीय मान्यता

Leave a Comment