केजहून बीडकडे नेत असताना पोलिस व्हॅनचा अपघात; मोटारसायकलस्वार गंभीर जखमीज्ञानराधा मल्टीस्टेट बँक घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी सुरेश कुटे व त्यांची पत्नी अर्चना कुटे यांना केज येथून बीड येथे नेत असताना पोलिस व्हॅनचा अपघात झाला.
ही घटना शनिवारी (ता. १७) सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास नेकनूर–येळंब रस्त्यावर घडली.अपघातात एका मोटारसायकलस्वाराला गंभीर दुखापत झाली असून त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
तसेच या अपघातात अर्चना कुटे यांनाही दुखापत झाली असून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अपघातामुळे काही काळ नेकनूर–येळंब रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली.या प्रकरणाची नोंद नेकनूर पोलीस ठाण्यात करण्यात येत असून अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास पोलीस करीत आहेत.







