---Advertisement---

बीड शहरात पुन्हा खून; अंकुश नगर परिसरात दुपारी तरुणाची हत्या, शहरात खळबळ

On: January 6, 2026 11:23 AM
Follow Us:
---Advertisement---

बीड (प्रतिनिधी):

बीड शहरात गेल्या काही दिवसांपासून शांतता होती; मात्र आज दुपारी पुन्हा एकदा खुनाची घटना घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

बीड शहरातील अंकुश नगर भागात आज दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास एका ३५ वर्षीय तरुणाचा अज्ञात व्यक्तीने खून केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.मृत तरुणाचे नाव हर्षद (तुषार) तुषार शिंदे (वय ३५) असून तो धानोरा रोड हाउसिंग कॉलनी, बीड येथील रहिवासी होता. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी परिसराची पाहणी करत पंचनामा सुरू केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.प्राप्त प्राथमिक माहितीनुसार, हर्षद शिंदे हा बीड नगरपालिकेसाठी प्लंबिंगचे काम करत होता. तो आज दुपारी अंकुश नगर परिसरात असताना त्याच्यावर अज्ञात व्यक्तीने प्राणघातक हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. मात्र खून नेमका कोणी आणि कोणत्या कारणामुळे केला, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.घटनेनंतर काही वेळातच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमा झाली होती.

पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत जमावाला शांत केले. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी सुरू असून, संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके सक्रिय करण्यात आली आहेत.दरम्यान, शहरात वारंवार घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत आहे.

दिवसाढवळ्या खुनासारखी घटना घडल्याने कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. नागरिकांनी पोलिसांकडून तातडीने आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे.या प्रकरणाचा शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून सर्व बाजूंनी तपास केला जात आहे.

पुढील तपासातून खुनामागील कारण आणि आरोपींची ओळख स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.बीड शहरात पुन्हा एकदा खून झाल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असून, प्रशासनाने कठोर पावले उचलावीत अशी मागणी होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

महत्वाच्या बातम्या

कपिलधार देवस्थानात १६ वर्षीय मुलीचा बालविवाह उधळलाAHTU च्या धडक कारवाईत मुलगी ताब्यात; ८ आरोपींसह ५०-६० वऱ्हाडींवर गुन्हा दाखल

दहावी-बारावीच्या परीक्षा केंद्रांवर ‘एआय’ कॅमेऱ्यांची कडक नजर; गैरप्रकार करणाऱ्यांवर थेट कारवाईचे आदेश

‘हीच खरी समाजसेवा’ – अपघातग्रस्ताला जीवदान देणाऱ्या ढाकणे दाम्पत्याचा गौरव

बेपत्ता राज्य कर अधिकारी सचिन जाधवर यांचा संशयास्पद मृत्यू; कारमध्ये आढळला मृतदेह, बीड जिल्ह्यात खळबळ

ज्ञानराधा मल्टिस्टेट प्रकरणात प्रशासन आक्रमक; 27 मालमत्तांच्या जप्तीसाठी न्यायालयात धडक

भायाळा गावातील बांगर कुटुंबावर हल्ला : आरोपीला अटक करा, महिलांना न्याय द्या – पाटोदा तालुक्यातील गावकऱ्यांचा एसपी कार्यालयावर मोर्चा

Leave a Comment