---Advertisement---

लिंबागणेश गावात बिबट्याचा वावर; ग्रामस्थांमध्ये भीती, वनविभागाची तातडीची बैठक

On: December 14, 2025 3:28 AM
Follow Us:
---Advertisement---

लिंबागणेश (दि. १4) :
बीड तालुक्यातील लिंबागणेश गावाच्या पोखरवाडा शिवारात काल रात्री बिबट्याचा वावर आढळून आल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वनविभागाने या घटनेची तातडीने दखल घेतली आहे.

पिंपरनई, पोखरी, बेलगाव आणि फुकेवाडी ही गावे वनविभागाच्या अधिपत्याखाली येतात. या परिसरात घनदाट जंगल असल्याने बिबट्यांचा वावर वाढल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी बिबट्या व त्याची पिल्ले परिसरात दिसल्याची माहिती वनविभागाला दिली होती; मात्र त्यावेळी अधिकृत नोंद नसल्याचे सांगण्यात आले होते.

दि. १२ रोजी रात्री पोखरवाडा शिवारात बिबट्या स्पष्टपणे दिसून आल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आज दि. १३ रोजी सकाळी वनविभागाचे अधिकारी महेश मते यांनी लिंबागणेश ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांशी संवाद साधत मार्गदर्शन केले. बैठकीचे प्रास्ताविक पत्रकार हरिओम क्षीरसागर यांनी केले, तर आभारप्रदर्शन डॉ. गणेश ढवळे यांनी केले.

या बैठकीला लिंबागणेशचे सरपंच बालासाहेब जाधव, पोखरी (घाट) चे सरपंच बिभीषण मुळीक, पिंपरनईचे सरपंच बाळासाहेब वायभट, उपसरपंच बाळकृष्ण थोरात, ग्रामपंचायत सदस्यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

पिंजरे लावून तात्काळ बंदोबस्ताची मागणी

बिबट्याचा वावर वाढल्यामुळे रात्रीच्या वेळी शेतात जाणे धोकादायक झाले असून महिला, लहान मुले व वृद्ध नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अनेक पालकांनी मुलांना घराबाहेर जाण्यास मज्जाव केला आहे.
या पार्श्वभूमीवर तात्काळ पिंजरे लावावेत, ड्रोनद्वारे शोधमोहीम राबवावी तसेच रात्रीची गस्त वाढवावी, अशी ठोस मागणी डॉ. गणेश ढवळे यांनी वनसंरक्षक अशोक केदार व अधिकारी महेश मते यांच्याकडे केली.

वनविभागाच्या सूचना

वनसंरक्षक अशोक केदार व महेश मते यांनी ग्रामस्थांना पुढील सूचना केल्या :

  • बिबट्या दिसल्यास तात्काळ वनविभागाला कळवावे
  • घराभोवती झुडुपे व गवत वाढू देऊ नये
  • जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत
  • रात्री पुरेसा प्रकाश ठेवावा
  • लहान मुलांना एकटे बाहेर पाठवू नये
  • रात्री शेकोटी पेटवणे व मोठ्या आवाजाचा वापर उपयुक्त ठरतो

अफवा टाळण्याचे आवाहन

नेकनूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब रोकडे यांनी ग्रामस्थांना अफवा पसरवू नयेत, वनविभागाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे आणि सतर्क राहावे, असे आवाहन केले. यावेळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल राठोड, हवालदार गणेश परझने, मन्सूर शेख आदी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

महत्वाच्या बातम्या

कपिलधार देवस्थानात १६ वर्षीय मुलीचा बालविवाह उधळलाAHTU च्या धडक कारवाईत मुलगी ताब्यात; ८ आरोपींसह ५०-६० वऱ्हाडींवर गुन्हा दाखल

दहावी-बारावीच्या परीक्षा केंद्रांवर ‘एआय’ कॅमेऱ्यांची कडक नजर; गैरप्रकार करणाऱ्यांवर थेट कारवाईचे आदेश

‘हीच खरी समाजसेवा’ – अपघातग्रस्ताला जीवदान देणाऱ्या ढाकणे दाम्पत्याचा गौरव

बेपत्ता राज्य कर अधिकारी सचिन जाधवर यांचा संशयास्पद मृत्यू; कारमध्ये आढळला मृतदेह, बीड जिल्ह्यात खळबळ

बीड शहरात पुन्हा खून; अंकुश नगर परिसरात दुपारी तरुणाची हत्या, शहरात खळबळ

ज्ञानराधा मल्टिस्टेट प्रकरणात प्रशासन आक्रमक; 27 मालमत्तांच्या जप्तीसाठी न्यायालयात धडक

Leave a Comment