---Advertisement---

पिंटू ठोंबरे व सुरज पटाईत यांच्या माध्यमातून गप्पेवाडीत विकासकामास सुरुवात

On: December 27, 2025 1:18 PM
Follow Us:
---Advertisement---

गप्पेवाडीतील बाराभाई वस्ती व महादेव वस्तीतील रस्त्याच्या कामास अखेर मुहूर्तस्वातंत्र्यानंतर प्रथमच नागरिकांचा चिखलातून सुटका होणार

केज प्रतिनिधी

विडा जिल्हा परिषद गटातील गप्पेवाडी गावासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या विकासकामास अखेर सुरुवात झाली आहे. गप्पेवाडी येथील बाराभाई वस्ती व महादेव वस्ती येथील बहुप्रतीक्षित रस्त्याच्या कामाचा शुभारंभ विडा जिल्हा परिषद गटाचे भावी जिल्हा परिषद सदस्य पिंटू ठोंबरे व भावी पंचायत समिती सदस्य सुरज पटाईत यांच्या माध्यमातून करण्यात आला. तसेच या कामासाठी गप्पेवाडी येथील युवा नेते अर्जुन केदार यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने हे विकासकार्य मार्गी लागले आहे.

या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ नारळ फोडून पारंपरिक पद्धतीने करण्यात आला. यावेळी ग्रामस्थं , तरूण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या रस्त्याच्या मागणीला अखेर न्याय मिळाल्याने गावात आनंदाचे व समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले.

स्वातंत्र्यानंतर प्रथमच मूलभूत सुविधेची पूर्तताविशेष म्हणजे, भारत देश स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत या वस्तीतील नागरिकांना पावसाळ्यात प्रचंड चिखलाचा सामना करावा लागत होता. रस्त्याअभावी लहान मुले शाळेत जाण्यास अडचण, आजारी व्यक्तींना रुग्णालयात पोहोचण्यास विलंब, तसेच दैनंदिन जीवनातील अनेक अडथळे ग्रामस्थांना सहन करावे लागत होते. पावसाळ्यात तर परिस्थिती अत्यंत बिकट होत होती.

मात्र आता रस्त्याच्या कामास सुरुवात झाल्याने बाराभाई वस्ती व महादेव वस्तीतील नागरिकांचा हा दीर्घकाळचा त्रास संपणार आहे. त्यामुळे ही केवळ रस्त्याची सुरुवात नसून, ग्रामस्थांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवणारे ऐतिहासिक पाऊल असल्याचे मत स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.

लोकप्रतिनिधींच्या पुढाकारामुळे विकासाला गतीया विकासकामासाठी भावी जिल्हा परिषद सदस्य पिंटू ठोंबरे व भावी पंचायत समिती सदस्य सुरज पटाईत यांनी विशेष लक्ष घातले. त्यांनी संबंधित विभागांकडे सातत्याने पाठपुरावा करून निधी मंजूर करून घेतला. तसेच युवा नेते अर्जुन केदार यांनी गावपातळीवर नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी सांगितले की, “आम्ही अनेक वर्षे फक्त आश्वासनं ऐकत होतो. मात्र आता प्रत्यक्ष काम सुरू झाल्याने आम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळाला आहे.

”ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसादरस्त्याच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत संबंधित मान्यवरांचे आभार मानले. अनेक ज्येष्ठ नागरिकांनी भावना व्यक्त करत सांगितले की, “आमच्या आयुष्यात प्रथमच आमच्या वस्तीला चांगला रस्ता मिळणार आहे. ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.

”या रस्त्यामुळे केवळ वाहतुकीची सोय होणार नाही, तर भविष्यात शैक्षणिक, आरोग्यविषयक आणि आर्थिक विकासालाही चालना मिळणार आहे. शेतीमालाची वाहतूक सुलभ होणार असून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बाहेरगावी जाणे सोपे होईल.विकास हाच खरा अजेंडा

या कामाच्या माध्यमातून “विकास हाच खरा अजेंडा” असल्याचे स्पष्ट होत आहे. ग्रामीण भागातील दुर्लक्षित वस्तीपर्यंत मूलभूत सुविधा पोहोचवणे ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी असून, गप्पेवाडीतील हे रस्त्याचे काम त्याचे उत्तम उदाहरण ठरत आहे.

ग्रामस्थांच्या अपेक्षांवर खरे उतरून विकासाची गंगा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार भावी लोकप्रतिनिधींनी व्यक्त केला आहे. आगामी काळात गप्पेवाडी परिसरात आणखी विकासकामे मार्गी लागतील, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment