आष्टी तालुक्यातील चिंचाळा येथील रहिवासी आणि अहिल्यानगर पोलीस दलात कार्यरत असलेले पोलिस अंमलदार सुदाम राजकुमार पोकळे (वय २९) यांचा कर्तव्य बजावत असताना झालेल्या रस्ते अपघातात जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना कर्जत तालुक्यातील राशीन येथे गुरुवारी रात्री घडली.सुदाम पोकळे हे कर्जत पोलीस ठाण्याअंतर्गत राशीन पोलीस चौकीत कार्यरत होते. गुरुवारी रात्री ते आपल्या सहकाऱ्यांसह नियमित गस्तीवर (पेट्रोलिंग) असताना, एका भरधाव अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. धडक इतकी भीषण होती की त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.कर्तव्यावर असतानाच काळाने घाला घातल्याने या घटनेमुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अपघात करणाऱ्या वाहनाचा शोध सुरू असून पुढील तपास सुरू आहे.दरम्यान, सुदाम पोकळे यांच्या निधनाचे वृत्त कळताच त्यांच्या मूळ गावी चिंचाळा (ता. आष्टी) येथे शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी आणि लहान मुलगा असा परिवार आहे.
कर्तव्यावर असताना पोलिस अंमलदाराचा अपघाती मृत्यू; राशीन येथे भरधाव वाहनाची धडक
By स्टोरी बीड
On: December 19, 2025 9:52 AM
---Advertisement---










