अंबाजोगाई | प्रतिनिधी
मराठवाड्यातील शासकीय वैद्यकीय सेवेच्या गुणवत्तेचा दर्जा उंचावणारी एक अत्यंत अभिमानास्पद कामगिरी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (स्वाराती) साध्य केली आहे. येथील सूक्ष्मजीवशास्त्र विभागांतर्गत कार्यरत असलेल्या प्रयोगशाळांना त्यांच्या उच्च दर्जाच्या सेवेसाठी राष्ट्रीय मान्यता मंडळ (NABL) कडून अधिकृत प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.
१६ जानेवारी २०२६ रोजी हे मान्यतेचे पत्र प्राप्त झाल्याने स्वाराती रुग्णालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.ही मान्यता केवळ एक प्रशासकीय यश नसून, ग्रामीण आणि निमशहरी भागातील रुग्णांना मिळणाऱ्या वैद्यकीय सेवांच्या गुणवत्तेवर शिक्कामोर्तब करणारी आहे. NABL मानांकन म्हणजे प्रयोगशाळेतील तपासण्या अचूक, विश्वासार्ह आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या निकषांनुसार होत असल्याची खात्री.२०२० पासून सातत्याने गुणवत्तेची परंपरास्वारातीच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागात कार्यरत असलेल्याएकात्मिक सल्ला व चाचणी केंद्र (ICTC)स्टेट रेफरन्स लॅबोरेटरीव्हायरल लोड लॅबोरेटरीया तिन्ही प्रयोगशाळांना सन २०२० पासून NABL मानांकन प्राप्त आहे. यावर्षी झालेल्या परीक्षणानंतर ही मान्यता पुढील कालावधीसाठी नूतनीकरण करण्यात आली आहे.या प्रयोगशाळांमध्ये प्रामुख्यानेएचआयव्ही संशयित रुग्णांची तपासणीरुग्णांचे समुपदेशनएचआयव्ही बाधित रुग्णांमधील व्हायरल लोड (विषाणूंची संख्या) तपासणेअशा अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाच्या चाचण्या केल्या जातात. या तपासण्यांमुळे रुग्णांच्या उपचाराची दिशा निश्चित होते, त्यामुळे त्यातील अचूकता अत्यंत महत्त्वाची असते.
दरवर्षी ४८ हजारांहून अधिक चाचण्यास्वारातीतील या NABL मानांकित प्रयोगशाळांमार्फत दरवर्षी सुमारे ४८ हजारांपेक्षा अधिक चाचण्या केल्या जातात. ही संख्या राज्यातील अनेक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या तुलनेत लक्षणीय आहे.केवळ चाचण्यांची संख्या नव्हे, तर त्यांची गुणवत्ता, वेळेत मिळणारे अहवाल, रुग्णांशी होणारे समुपदेशन आणि गोपनीयता यामुळे या प्रयोगशाळांनी राज्यात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. मराठवाड्यातीलच नव्हे तर आसपासच्या जिल्ह्यांतील रुग्णही या प्रयोगशाळांवर विश्वास ठेवून तपासणीसाठी येतात.दोन दिवसांचे सखोल NABL परीक्षणमिळालेल्या माहितीनुसार, २७ आणि २८ डिसेंबर २०२५ रोजी NABL संस्थेच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने या प्रयोगशाळांचे सखोल परीक्षण केले.
दोन दिवस चाललेल्या या प्रक्रियेत प्रत्येक बाब अत्यंत काटेकोरपणे तपासण्यात आली.या परीक्षणात प्रामुख्याने –प्रयोगशाळेतील आधुनिक उपकरणांची अचूकताचाचणी प्रक्रियेचे दस्तऐवजीकरणकर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणस्वच्छता व जैवसुरक्षा नियमगुणवत्ता नियंत्रण पद्धतीया सर्व घटकांचा समावेश होता. या सर्व निकषांवर स्वारातीच्या प्रयोगशाळांनी उच्च दर्जा कायम राखल्याचे निरीक्षण पथकाच्या निदर्शनास आले.याच समाधानकारक अहवालाच्या आधारे १६ जानेवारी २०२६ रोजी NABL कडून अधिकृत मान्यता प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.नेतृत्व आणि टीमवर्कमुळे यशया उल्लेखनीय यशामागे स्वाराती प्रशासन आणि सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील संपूर्ण टीमचे योगदान मोलाचे आहे.
या प्रक्रियेसाठीअधिष्ठाता डॉ. शंकर धपाटेवैद्यकीय अधीक्षक डॉ. राकेश जाधवसूक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख डॉ. भाऊसाहेब मुंडेयांचे मार्गदर्शन लाभले.तसेचसहयोगी प्राध्यापक डॉ. संदीप निळेकरडॉ. दिपाली कुलकर्णीयांनी NABL परीक्षणासाठी विशेष परिश्रम घेतले.नोडल ऑफिसरची महत्त्वाची भूमिकाप्रयोगशाळेचे दैनंदिन कामकाज, कागदपत्रांची पूर्तता, गुणवत्ता निकषांचे पालन आणि NABL पथकासमोर सादरीकरणाची संपूर्ण जबाबदारी नोडल ऑफिसर डॉ. अमित लोमटे आणि डॉ. अर्जुन जाधव यांनी अत्यंत यशस्वीपणे पार पाडली.यासोबतच प्रयोगशाळेतील सर्व समुपदेशक, तंत्रज्ञ आणि कर्मचारी वर्गाने घेतलेल्या मेहनतीमुळेच हे यश शक्य झाले, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.रुग्णांसाठी मोठा फायदाया NABL मान्यतेमुळे अंबाजोगाई आणि परिसरातील हजारो रुग्णांना थेट लाभ होणार आहे.
चाचण्यांचे अहवाल अधिक अचूक मिळणारउपचारात वेळेची बचत होणाररुग्णांचा शासकीय आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास वाढणारविशेषतः एचआयव्ही सारख्या आजारांमध्ये वेळेवर आणि विश्वासार्ह तपासणी अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळे ही मान्यता सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी मैलाचा दगड ठरणार आहे.स्वाराती रुग्णालयाने मिळवलेली NABL मान्यता ही केवळ एक सन्मानाची बाब नसून, ग्रामीण भागातील आरोग्य सेवांचा दर्जा राष्ट्रीय पातळीवर पोहोचत असल्याचे प्रतीक आहे.










