---Advertisement---
On: January 31, 2026 7:18 AM
Follow Us:
---Advertisement---

“शब्दाचा पक्का, कामात वाघ… महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘ *अजित पर्वाचा* ‘ अकाली अस्त!”महाराष्ट्राच्या राजकारणातील एक झंझावात, प्रशासनावर जरब असणारे कणखर नेतृत्व आणि जनसामान्यांचे लाडके ‘ *दादा* ‘, राज्याचे उपमुख्यमंत्री *अजित दादा पवार* यांचे अपघाती निधन झाल्याची बातमी अत्यंत धक्कादायक आणि मनाला चटका लावून जाणारी आहे.*दादा* म्हणजेपहाटेच्या वेळी कामाला सुरुवात करणारा हा ‘लोकाभिमुख’ नेता आज शांत झाला. बारामतीपासून मंत्रालयापर्यंत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या दादांनी नेहमीच विकासाला प्राधान्य दिले. सडेतोड बोलणे आणि दिलेला शब्द पाळणे ही त्यांची ओळख महाराष्ट्राच्या राजकारणात सदैव अजरामर राहील.*दादा* तुमच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावरील एक तेजस्वी तारा निखळला आहे. शिस्त, स्पष्टवक्तेपणा आणि अहोरात्र कष्ट करण्याची तुमची वृत्ती आम्हा सर्वांसाठी कायम प्रेरणादायी असेल. राज्याच्या विकासातील तुमचे योगदान कधीही विसरता येणार नाही.ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि पवार कुटुंबासह सर्व कार्यकर्त्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच प्रार्थना.*भावपूर्ण श्रद्धांजली*!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment