राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपली असून, त्यानंतर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. सत्ताधारी, विरोधी पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी मोठ्या संख्येने अर्ज दाखल केल्यामुळे अनेक ठिकाणी बंडखोरी, मैत्रीपूर्ण लढती आणि नव्या युती-आघाड्यांचे समीकरण समोर आले आहे.
काही महानगरपालिकांमध्ये पक्षांनी युतीचा मार्ग स्वीकारला असला, तरी अनेक ठिकाणी प्रमुख पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. अर्ज प्रक्रियेअंती आता कोणत्या महापालिकेत कोणता पक्ष किती जागांवर निवडणूक लढवत आहे, हे स्पष्ट झाले असून राज्यातील राजकीय चित्र अधिक ठळक झाले आहे.
ठाणे महापालिका (131 जागा): सर्वाधिक चुरशीची लढत
ठाणे महापालिकेत सर्वच प्रमुख पक्ष मोठ्या संख्येने मैदानात उतरले आहेत.
शिवसेना – 87 जागा
भाजप – 40 जागा
राष्ट्रवादी काँग्रेस – 75 (स्वबळावर)
काँग्रेस – 100 (स्वबळावर)
मनसे – 34
शिवसेना (ठाकरे गट) – 53
राष्ट्रवादी (शरद पवार गट) – 36
येथे महाविकास आघाडी आणि महायुती दोन्हींत अंतर्गत अस्वस्थता आणि बंडखोरी दिसून येत आहे.
नागपूर महानगरपालिका (151 जागा): भाजपचा पूर्ण ताकदीने हल्ला
नागपूरमध्ये भाजपने जवळपास सर्व जागांवर उमेदवार दिले आहेत.
भाजप – 143
काँग्रेस – 151
राष्ट्रवादी – 94
राष्ट्रवादी (शरद पवार) – 64
शिवसेना – 8
शिवसेना (ठाकरे) – 10 (आकडा अपूर्ण)
मनसे – 15
वंचित – 75
MIM – 3
बसपा – 8
नागपूरमध्ये बहुपक्षीय लढत असून मतांचे विभाजन निकालावर निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
चंद्रपूर महापालिका (66 जागा): स्वबळ आणि युतींचा संगम
भाजप – 58
काँग्रेस – 63
राष्ट्रवादी – 40 (स्वबळावर)
राष्ट्रवादी (शरद पवार) – 55
शिवसेना – 8
शिवसेना (ठाकरे) व वंचित – प्रत्येकी 33
मनसे – 25 (स्वबळावर)
जनविकास सेना – 3
येथे ठाकरे गट आणि वंचित युतीकडे विशेष लक्ष आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका (128 जागा): युतींचे रणांगण
पिंपरी-चिंचवडमध्ये सर्वाधिक गुंतागुंतीचे समीकरण पाहायला मिळत आहे.
भाजप + आरपीआय (आठवले) युती
भाजप – 123
आरपीआय – 5
राष्ट्रवादी आघाडी
अजित पवार गट – 110
शरद पवार गट – 18
शिवसेना (ठाकरे)–मनसे–रासप युती
ठाकरे गट – 63
मनसे – 19
रासप – 3
काँग्रेस – 60 (स्वबळावर शक्यता)
आम आदमी पार्टी – 40 (स्वबळावर शक्यता)
वंचित – काही जागा
छत्रपती संभाजीनगर (115 जागा): त्रिकोणी नव्हे, बहुकोणी लढत
भाजप – 95
शिवसेना – 87
उबाठा – 89
राष्ट्रवादी – 82
राष्ट्रवादी (शरद पवार) – 22
वंचित – 70
येथे सर्वच पक्ष ताकदीने उतरल्यामुळे निकाल अनिश्चित मानला जात आहे.
लातूर, जालना आणि मालेगाव: स्थानिक समीकरण महत्त्वाचे
लातूर (70 जागा)
भाजप – 70
काँग्रेस – 65
राष्ट्रवादी – 60
शिवसेना – 11
शरद पवार गट – 17
ठाकरे गट – 9
वंचित – 5
जालना (65 जागा)
भाजप – 64 + RPI – 1
शिवसेना – 65
राष्ट्रवादी-वंचित-मनसे युती – 56
महाविकास आघाडी –
काँग्रेस – 40
शरद पवार – 13
ठाकरे गट – 12
मालेगाव (84 जागा)
MIM – 57
ISMAL + समाजवादी – 63
शिवसेना – 24
भाजप – 20
काँग्रेस – 22
राष्ट्रवादी – 10
ठाकरे गट – 12







