---Advertisement---

राज्यात खळबळ: शिवसेना-भाजप युती तुटली

On: December 28, 2025 3:12 PM
Follow Us:
---Advertisement---

अमरावती महापालिकेत सेना-भाजप युती तुटली, राज्याच्या राजकारणात खळबळ

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सर्वच प्रमुख राजकीय पक्ष सध्या मोर्चेबांधणी, युती-आघाडी आणि जागावाटपाच्या चर्चांमध्ये व्यस्त आहेत.

अनेक ठिकाणी जागावाटप अंतिम टप्प्यात पोहोचले असताना काही शहरांमध्ये मात्र युतीच्या चर्चा फिस्कटताना दिसत आहेत. अशाच पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिकेतून एक मोठी आणि धक्कादायक राजकीय बातमी समोर आली आहे.

अमरावती महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना यांच्यात सुरू असलेली युतीची चर्चा अखेर अपयशी ठरली असून, दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्य पातळीवर युती असतानाही स्थानिक पातळीवर मतभेद झाल्यामुळे अमरावतीत सेना-भाजप वेगळे झाल्याने संपूर्ण राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

मुंबईत युती, पण अमरावतीत वेगळे रस्तेमुंबई महानगरपालिकेसाठी शिवसेना आणि भाजप यांची युती जाहीर झाली असली, तरी राज्यातील इतर महानगरपालिकांमध्ये दोन्ही पक्ष आपापल्या राजकीय गणितानुसार निर्णय घेताना दिसत आहेत. काही ठिकाणी युती, काही ठिकाणी स्वतंत्र लढत, तर काही शहरांमध्ये स्थानिक पक्षांसोबत आघाड्या केल्या जात आहेत.

अमरावतीत मात्र शिवसेना आणि भाजपमधील जागावाटपाचा तिढा सुटू शकला नाही. त्यामुळे अखेर युती तोडण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे समजते.जागावाटपावरून वाद, चर्चा फिस्कटल्यासूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेने अमरावती महापालिकेसाठी भाजपकडे तब्बल २५ जागांची मागणी केली होती. मात्र भाजपने हा प्रस्ताव मान्य करण्यास नकार दिला. भाजपकडून शिवसेनेला ८७ जागांपैकी केवळ १५ ते १६ जागा देण्याची तयारी होती, अशीही माहिती समोर येत आहे.या जागावाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये अनेक फेऱ्यांमध्ये चर्चा झाल्या, मात्र अखेर कोणताही तोडगा निघू शकला नाही.

परिणामी अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीत सेना आणि भाजप स्वतंत्रपणे रिंगणात उतरणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.मतदान आणि मतमोजणीची तारीखअमरावती महानगरपालिकेसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून १६ जानेवारी रोजी मतमोजणी पार पडणार आहे. सध्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने सर्वच राजकीय पक्षांची धावपळ सुरू आहे. युती तुटल्यामुळे आता दोन्ही पक्षांना उमेदवार निवड, प्रचार रणनीती आणि स्थानिक समीकरणे नव्याने आखावी लागणार आहेत.मतविभाजनाचा धोका, फटका कोणाला?राज्य पातळीवर युती असतानाही स्थानिक पातळीवर वेगळे लढल्यास मतांचे विभाजन होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अमरावतीत भाजप आणि शिवसेना वेगवेगळे लढल्यास त्याचा फायदा विरोधकांना होऊ शकतो, असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे. विशेषतः काँग्रेस, एमआयएम आणि इतर स्थानिक पक्षांसाठी ही संधी ठरू शकते.अभिजीत अडसूळ यांची महत्त्वाची पत्रकार परिषदया सगळ्या घडामोडींमध्ये शिवसेनेचे नेते अभिजीत अडसूळ आज सायंकाळी साडेपाच वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती आहे. या पत्रकार परिषदेत युती तुटण्यामागची भूमिका, शिवसेनेची पुढील रणनीती आणि निवडणुकीबाबतची दिशा स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे सर्वांचे लक्ष या पत्रकार परिषदेकडे लागले आहे.२०१७ चा अमरावती महापालिकेचा निकाल२०१७ साली झालेल्या अमरावती महानगरपालिका निवडणुकीत भाजपने दमदार कामगिरी करत सत्ता मिळवली होती.

भाजपने ४५ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले होते. त्यामुळे चेतन गावंडे यांच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडली होती.

त्या निवडणुकीत:काँग्रेस – १५ जागा शिवसेना – ७ जागा एमआयएम – १० जागा बहुजन समाज पार्टी – ५ जागा युवा स्वाभिमान (रवी राणा) – ३ जागा आरपीआय (आठवले गट) – १ जागा अपक्ष – १ जागा असा निकाल लागला होता.

मात्र यावेळी राजकीय समीकरणे बदललेली असून, सेना-भाजप वेगवेगळे लढल्याने अमरावतीत रंगतदार आणि चुरशीची लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment