---Advertisement---

मौजे बोरफडी येथे ‘अनिमिया मुक्त गाव’ उपक्रमाचा दिमाखदार शुभारंभ

On: December 25, 2025 12:40 PM
Follow Us:
---Advertisement---

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत आरोग्यदायी गावनिर्मितीकडे महत्त्वाचे पाऊल

बीड | प्रतिनिधी

बीड तालुक्यातील मौजे बोरफडी येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत ‘अनिमिया मुक्त गाव’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. गटविकास अधिकारी श्री. अनिरुद्ध सानप यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. ग्रामपंचायत बोरफडीचे सरपंच श्री. कैलास घुगे यांच्या पुढाकाराने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.ग्रामीण भागात विशेषतः महिला, बालके आणि किशोरवयीन मुलींमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळणाऱ्या अनिमिया (रक्तक्षय) आजारावर प्रभावी नियंत्रण मिळवणे आणि आरोग्यदायी समाजनिर्मिती करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून मौजे बोरफडी हे अनिमिया मुक्त आणि आदर्श गाव म्हणून विकसित करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.अनिमिया आजाराबाबत सखोल मार्गदर्शनया कार्यक्रमात वैद्यकीय अधिकारी डॉ. सय्यद यांनी उपस्थित ग्रामस्थांना अनिमिया आजाराबाबत सविस्तर व शास्त्रीय मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, अनिमिया म्हणजे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे होय. ही समस्या प्रामुख्याने महिलांमध्ये, गरोदर माता, लहान मुले आणि किशोरवयीन मुलींमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळते.

योग्य व संतुलित आहार, लोहयुक्त अन्नपदार्थांचा नियमित समावेश, वेळोवेळी आरोग्य तपासणी आणि डॉक्टरांनी सुचवलेले औषधोपचार केल्यास अनिमिया पूर्णतः नियंत्रणात आणता येतो, असे त्यांनी स्पष्ट केले. हिरव्या पालेभाज्या, डाळी, कडधान्ये, गूळ, खजूर, डाळिंब, लोहयुक्त गोळ्या यांचे महत्त्वही त्यांनी उपस्थितांना समजावून सांगितले.सुदृढ समाजासाठी आरोग्य महत्त्वाचे – अनिरुद्ध सानपगटविकास अधिकारी श्री. अनिरुद्ध सानप यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात ‘अनिमिया मुक्त गाव’ उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “सुदृढ समाजनिर्मितीसाठी आरोग्य हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. गावातील प्रत्येक नागरिक निरोगी असेल, तरच गावाचा सर्वांगीण विकास शक्य आहे.”

ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आणि शालेय शिक्षक यांनी एकत्रितपणे व समन्वयाने काम केल्यास गाव अनिमियामुक्त करणे निश्चितच शक्य आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा लाभ प्रत्येक गरजू घटकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

सर्व नागरिकांची हिमोग्लोबिन तपासणी करण्याचा संकल्पकार्यक्रमाचे आयोजक आणि ग्रामपंचायत बोरफडीचे सरपंच श्री. कैलास घुगे यांनी आपल्या मनोगतातून गावाच्या आरोग्यविषयक विकासासाठी ठोस संकल्प जाहीर केला. त्यांनी सांगितले की, गावातील महिला, पुरुष, बालके आणि किशोरवयीन मुला-मुली यांची टप्प्याटप्प्याने हिमोग्लोबिन तपासणी करण्यात येणार आहे.तपासणीदरम्यान ज्यांच्यात अनिमियाची लक्षणे आढळून येतील, त्यांच्यावर तातडीने आवश्यक ते उपचार करण्यात येतील. यासोबतच पोषणविषयक जनजागृती कार्यक्रम, आरोग्य शिबिरे आणि आहार सल्ला कार्यक्रम सातत्याने राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसादया कार्यक्रमास विस्तार अधिकारी श्री. पारटकर सर, चांगन सर, युवा उद्योजक श्री. सुनील कुटे, ग्रामपंचायत सदस्य, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत अधिकारी श्री. गिते, शालेय विद्यार्थी, महिला, किशोरवयीन मुले-मुली तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमादरम्यान ग्रामस्थांनी अनिमिया मुक्त गाव उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद देत सक्रिय सहभाग नोंदविला. आरोग्य तपासणी, पोषण आहार आणि स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.

आदर्श व निरोगी गाव घडविण्याचा निर्धार‘अनिमिया मुक्त गाव’ उपक्रमाच्या माध्यमातून मौजे बोरफडी हे आरोग्यदृष्ट्या सक्षम, सशक्त आणि आदर्श गाव म्हणून विकसित करण्याचा निर्धार या कार्यक्रमातून स्पष्टपणे दिसून आला. शासनाच्या आरोग्यविषयक योजनांचा प्रभावी अंमल आणि लोकसहभागाच्या जोरावर बोरफडी गाव निश्चितच इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

महत्वाच्या बातम्या

कपिलधार देवस्थानात १६ वर्षीय मुलीचा बालविवाह उधळलाAHTU च्या धडक कारवाईत मुलगी ताब्यात; ८ आरोपींसह ५०-६० वऱ्हाडींवर गुन्हा दाखल

दहावी-बारावीच्या परीक्षा केंद्रांवर ‘एआय’ कॅमेऱ्यांची कडक नजर; गैरप्रकार करणाऱ्यांवर थेट कारवाईचे आदेश

‘हीच खरी समाजसेवा’ – अपघातग्रस्ताला जीवदान देणाऱ्या ढाकणे दाम्पत्याचा गौरव

बेपत्ता राज्य कर अधिकारी सचिन जाधवर यांचा संशयास्पद मृत्यू; कारमध्ये आढळला मृतदेह, बीड जिल्ह्यात खळबळ

बीड शहरात पुन्हा खून; अंकुश नगर परिसरात दुपारी तरुणाची हत्या, शहरात खळबळ

ज्ञानराधा मल्टिस्टेट प्रकरणात प्रशासन आक्रमक; 27 मालमत्तांच्या जप्तीसाठी न्यायालयात धडक

Leave a Comment