---Advertisement---

भारतीय जनता मजदूर संघाचे राष्ट्रव्यापी पत्र व निवेदन अभियान

On: December 21, 2025 1:24 AM
Follow Us:
---Advertisement---

३१ डिसेंबर २०२५ रोजी देशभर आयोजन; महिलांच्या न्याय हक्कासाठी शांततापूर्ण आंदोलन – शांत प्रकाशजी जाटव

केज / प्रतिनिधी

देशातील अंगणवाडी सेविका, आशा व आशा स्वयंसेविका यांच्या न्याय्य हक्कांसाठी भारतीय जनता मजदूर संघाच्या वतीने दि. ३१ डिसेंबर २०२५ रोजी देशभरात राष्ट्रव्यापी पत्र व निवेदन अभियान राबविण्यात येणार आहे. या व्यापक अभियानाचे नेतृत्व संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शांत प्रकाशजी जाटव करीत असून, लाखो महिला कार्यकर्त्यांच्या श्रमिक हक्कांसाठी सरकारचे लक्ष वेधणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.महिलांच्या श्रमिक हक्कांसाठी निर्णायक पाऊलभारतातील अंगणवाडी सेविका व आशा कार्यकर्त्या या आरोग्य, पोषण आणि बालकल्याण व्यवस्थेचा कणा मानल्या जातात.

मात्र प्रत्यक्षात या महिला कार्यकर्त्यांकडून सातत्याने नियमित, वेळेत व लक्ष्य आधारित काम करून घेतले जात असले तरी त्यांना आजही श्रमिक म्हणून वैधानिक ओळख, योग्य मानधन व सामाजिक सुरक्षा मिळालेली नाही, ही बाब गंभीर असल्याचे भारतीय जनता मजदूर संघाने स्पष्ट केले आहे.संघटनेच्या मते, माननीय सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या निर्णयांनुसार कामाच्या मोबदल्यात पारिश्रमिक मिळणारी व्यक्ती ही श्रमिकांच्या श्रेणीत मोडते. असे असतानाही अंगणवाडी व आशा कार्यकर्त्यांना श्रमिक दर्जा, आरोग्य विमा, भविष्य निर्वाह निधी, निवृत्तीवेतन यांसारख्या मूलभूत सुविधा अद्याप उपलब्ध नाहीत, ही सामाजिक अन्यायाची बाब आहे.

अभियानाचा मुख्य उद्देशया राष्ट्रव्यापी अभियानाच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे खालील प्रमुख मागण्या मांडण्यात येणार आहेत –अंगणवाडी सेविका व आशा कार्यकर्त्यांना श्रमिक म्हणून कायदेशीर दर्जात्यांच्या कामाच्या स्वरूपानुसार योग्य व वेळेवर मानधनसामाजिक सुरक्षा योजना, आरोग्य विमा व निवृत्ती लाभकामाच्या तासांचे निश्चितीकरण व सन्मानजनक कार्य अटीअभियानाची कार्यपद्धतीया अभियानाची रचना अत्यंत शिस्तबद्ध व शांततापूर्ण पद्धतीने करण्यात आली आहे.केंद्रीय स्तरावर पत्र मोहीम राबविण्यात येणार असून, संघटनेने तयार केलेल्या समान पत्र प्रारूपावर कार्यकर्ते आपली स्वाक्षरी करून नाव, पत्ता व मोबाईल क्रमांक नमूद करतील.

ही पत्रे स्पीड पोस्ट अथवा टपालाद्वारे पंतप्रधान व संबंधित केंद्रीय मंत्र्यांना पाठविण्यात येणार आहेत.त्याचबरोबर जिल्हा स्तरावर अंगणवाडी व आशा कार्यकर्त्या समूहबद्ध होऊन जिल्हाधिकाऱ्यांना शांततापूर्ण व मर्यादित स्वरूपात निवेदन सादर करणार आहेत. कोणत्याही प्रकारचा गोंधळ किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन संघटनेने केले आहे.

पदाधिकाऱ्यांची जबाबदारीभारतीय जनता मजदूर संघाने सर्व राष्ट्रीय, राज्य, विभागीय व जिल्हा पदाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत की –अभियानाची संपूर्ण माहिती वेळेत प्रत्येक कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवावीअभियानाचे उद्दिष्ट तथ्यात्मक व स्पष्ट पद्धतीने समजावून सांगावेसंपूर्ण अभियानादरम्यान शिस्त, मर्यादा व संघटनेची प्रतिष्ठा कायम राखावीसंघटनेच्या मते, हे आंदोलन कोणत्याही राजकीय दबावासाठी नसून, केवळ महिलांच्या न्याय्य हक्कांसाठीचे लोकशाही मार्गाने केलेले प्रयत्न आहेत.२७ लाखांहून अधिक कार्यकर्त्यांचा सहभाग अपेक्षितया राष्ट्रव्यापी उपक्रमात देशभरातील सुमारे २७ लाख अंगणवाडी व आशा कार्यकर्त्यांचा सहभाग अपेक्षित आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या सहभागामुळे राष्ट्रीय पातळीवर या प्रश्नावर सकारात्मक संवाद, धोरणात्मक विचारमंथन व ठोस निर्णय प्रक्रिया सुरू होईल, असा विश्वास भारतीय जनता मजदूर संघाने व्यक्त केला आहे.

सहभागासाठी आवाह नया अभियानात सर्व अंगणवाडी सेविका, अंगणवाडी कार्यकर्त्या, आशा व आशा स्वयंसेविका यांनी सक्रिय सहभाग घ्यावा, पत्रव्यवहार करावा तसेच दि. ३१ डिसेंबर २०२५ रोजी जिल्हा व तालुका स्तरावर निवेदन देण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी व सहभाग नोंदणीसाठी खालील पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे –

भाऊसाहेब घोडके – राष्ट्रीय सचिव📞 ९०२१२४३५३५धनंजय कुलकर्णी – महाराष्ट्र राज्य सचिव📞 ९८२२०९६९७९चंद्रकांत पाटील – मराठवाडा विभागीय सचिव📞 ९३२५७०५४५८

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment